ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आव्हाडांची कोश्यारींविरोधात तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले; “वाट कसली बघताय, इज्जत प्रिय असेल तर…”;

मुंबई : (Jitendra Awhad On Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांच्या पदावरून आणि जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ जारी करत इज्जत प्रिय असेल तर गप्प निघून जा, तुम्ही जावं ही महाराष्ट्राची इच्छा अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे.

“राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपलं डोकं वापरून राजीनामा, पदमुक्त होण्याचं ठरवलं आहे, अहो वाट कसली बघताय? राष्ट्रपती भवनात राजीनामा पाठवून द्या अपोआप स्विकारला जाईल आणि पटकन विमान पकडा आणि आपल्या गावी निघून जा. तुमच्या बॅगा नंतर महाराष्ट्रातेल, मंत्रालयातले किंवा राज्यपाल भवनातले कर्मचारी पॅक करून पाठवून देतील” असं मत आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

आव्हाड पुढे म्हणाले की, “जनभावना तुमच्या विरोधात इतकी आहे की लोकांच्या मनात महाराष्ट्र निर्मीतीच्या साठ-सत्तर वर्षात एवढा राग कोणाबद्दल लोकांच्या मनात असेल असं मला वाटत नाही, इतक्या शिव्या कोणत्याच राज्यपालांनी खाल्ल्या नसतील इतक्या शिव्या तुम्ही खाल्ल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये