ताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

मुंबई | Vikram Kirloskar Passed Away – टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 64 वर्षांचे होते. आज (30 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता बंगळुरमधील हेब्बल स्माशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. विक्रम किर्लोस्कर हे प्रसिद्ध उद्योजकांपैकी एक होते. तसंच टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचं श्रेय किर्लोस्कर यांना जातं.

टोयोटा इंडिया (Toyota India) कंपनीनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. “टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं 29 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झालं. या वृत्तानं आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आमची सहानुभूती त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत आहे. त्यांच्या पार्थिवावर 30 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत”, असं कंपनीनं म्हटलं आहे.

विक्रम किर्लोस्कर यांनी MIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. तसंच त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय ते किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​उपाध्यक्षही होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये