ताज्या बातम्यारणधुमाळी

“…त्याचा स्फोट लवकरच होईल”, संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

नाशिक | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) आणि सरकारवर निशाणा साधला आहे. कुठल्याही गावात जा तिथं गद्दारांना खोकेवाले आले असं म्हटलं जातंय. त्यामुळे फुटलेल्या आमदार आणि खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असं संजय राऊत म्हणाले. ते आज (2 डिसेंबर) नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला.

सध्या शिंदे गटामध्ये काय सुरु आहे, कुणाचं बिनसलं आहे याची पक्की खबर आमच्याकडे आहे. त्याचा स्फोट लवकरच होईल. आता गद्दारांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या बायका-पोरांनाही याचा त्रास होईल. त्यांच्या पिढ्यांना देखील ही ‘गद्दारी’ शांत जगू देणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे सुरक्षेच्या बाबतीत बोलताना राऊत म्हणाले, यांनी आमच्या सुरक्षा काढल्या पण आम्हाला काहीही फरक पडत नाही. त्यांनी स्वतःच्या सुरक्षा काढून बघाव्यात मग कळेल महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे ती. तसंच संजय राऊतांनी जतमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्याबद्दलही वक्तव्य केलं. सरकारनं त्या पाण्यात जलसमाधी घ्यावी, असा खोचक सल्लाही राऊतांनी दिला.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये