ताज्या बातम्यारणधुमाळी

“उठ दुपारी आणि घे सुपारी…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर मिश्कील टिपण्णी

मुलुंड | Sushama Andhare – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “आमच्याकडे एक पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला. त्या गुरूवारी (1 डिसेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करत ते अचानक गुहेतून बाहेर येतात अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात”, असा टोला अंधारेंनी राज ठाकरेंना लगावलाय.

“दोनच मुद्दे मांडा पण व्यवस्थित मांडाना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मध्येच मी विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये