क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

राहुल – शुभमनची अर्धशतकी सलामी, भारतची आघाडी 318 पार…

चितगाव : (IND Vs BAN 1st Test Match 2022) बांगलादेश विरूद्ध भारत पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेश आपला पहिला डाव 8 बाद 133 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केला. मात्र कुलदीप यादवने इबादतला 17 धावांवर बाद करत बागंलादेशला 9 वा धक्का दिला.

त्यानंतर मेहदी हसनने बांगलादेशला 25 धावा करत 150 च्या पार पोहचवले. मात्र अक्षर पटेलने त्याला लगेचच बाद करत बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात संपवला. यानंतर भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेऊन देखील बांगलादेशला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताने दुसऱ्या डावात केएल राहुल आणि शुभमन गिलने नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. केएल राहुल नाबाद 58 चेंडूत 23 धावांवर खेळत आहे तर, शुभमन गिल नाबाद 74 चेंडूत 42 धावांवर खेळत आहे. या दोघांच्या जोरावर भारताने आपली आघाडी 318 च्या पार पोहचवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये