राहुल शेवाळेंचे आरोप म्हणजे ‘बुडत्याचा पाय खोलात’ सावंतांची टीका, आदित्य ठाकरेंचं तोंडभरून कौतुक

मुंबई : Maharashtra Politics – राहुल शेवाळे (Rahul Shewale Case) यांचाय्वरील बलात्काराच्या आरोपांवर एसआयटी (SIT) चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान, ज्या महिलेचा बलात्कार केल्याचा आरोप आहे त्या महिलेने देखील आणखी काही मोठमोठे आरोप शेवाळे यांच्यावर केले आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांच्या अडचणीत आता वाढ झालेली दिसत आहे.
“माझ्यावर बलात्काराच्या खोटे आरोप केले जात आहेत. ज्या महिलेचा बलात्कार केल्याचा आरोप होतोय माझा तिच्याशी संपर्क होत होता. मात्र, बलात्काराचे आरोप खोटे केले जात आहेत. त्या महिलेचा पाकिस्तानातील दाउतशी संबंधी आहे. ती जे आरोप करतेय ते आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरून करतेय.” अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली होती. महिलेचा दाउतशी संबंध असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केल्यामुळे या प्रकरणात आणखीनच ट्वीस्ट आला आहे.
बुडत्याचा पाय खोलात
दरम्यान, शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी या राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल शेवाळे आता चिखलात फसलेले आहेत. ते जसजसे पाय हलवतील तसतसे ते आणखी बुडणार आहेत. आदित्य ठाकरे सोन्यासारखा मुलगा आहे. त्याच्यासारखं नेतृत्व नव्या पिढीला मिळणं हे तरुणांचं भाग्य आहे. आदित्य ठाकरे हे खूप दूरदृष्टी नेतृत्व आहे. ते महापालिकेच्या निवडणूकींत प्रभावी असणार आहे. त्यामुळे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.” अशी प्रतिक्रिया अरविंद शेवाळे यांनी दिली आहे.