ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार म्हणजे जाणार’; नारायण राणेंचा दावा

सिंधुदुर्ग : (Narayan Rane On Aaditya Thackeray) दिशा सालियान (Sushant Singh Disha Salian Case) प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. यात राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहे. भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पुन्हा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) बोलताना नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंह (Sushant Singh) आणि दिशा सालियानचं (Disha Salian) नाव आलं की आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) चवताळले. दिशा सालियन या एका भारतीय, महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते, सोडणार नाही. आता सत्ता भाजप आणि शिंदे गटाची आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे म्हणाले. यापूर्वीही नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन आरोप केलेले आहेत.

दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान प्रकरणी टीकेचा सामना करावा लागत आहे. भाजप नेत्यांकडून आदित्य ठाकरे यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये