ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेनेचं BMC मधील कार्यालय शिंदे गटाने घेतलं ताब्यात, कार्यकर्त्यांत तुफान राडा…

मुंबई : (Arvind Sawant On Rahul Shewale) बुधवारी दि. 28 रोजी शिंदे गटाचे काही कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. यामुळं दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफण राडा झाला. बराच वेळ हा गोंधळ सुरु राहिल्यानंतर अखेर पाचारण करण्यात आलं अन् त्यांनी दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांना महापालिकेतून बाहेर काढलं.

यावेळी आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “४० खोके एकदम ओक्के”, “आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा”, “उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, मुंबई महापालिकेवर हक्क बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे. त्यामुळं याचं महत्व आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इतर लोकांना भीक घालतं नाही, अशी प्रकारची टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “घटनाबाह्य सरकार त्यानंतर बेकायदेशीर वागणं या सगळ्याचा महाराष्ट्राच्या जनतेनं गंभीर दखलं घेतली पाहिजे. कारण यांना सर्वच गोष्टी बेकायदा पाहिजे आहेत. कुठेही घुसायचं काहीही करायचं. सुप्रिम कोर्टात प्रकरण सुरु असताना ही कोण माणसं आहेत जी दादागिरी करत आहेत. पालिका आयुक्तांनी यांच्यावर ताबडतोब अतिक्रमणाची केस दाकल करावी”, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये