पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ahamadabad : PM Narendra Modi’s Mother Heeraben Modi Passed away) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(Heeraben Modi Passed away) मागील काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehta Hospital Ahmedabad) उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज पहाटे हिराबेन मोदी यांचं निधन झालं.
अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) हिराबेन मोदी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 18 जून रोजी हिराबेन यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दिली आहे. तसंच आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, आज त्यांचं उपचार सुरु असताना निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईच्या निधनानंतर ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
One Comment