ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

आनंदाची बातमी! तब्बल ‘5 लाख सौर पंपां’चं शेतकऱ्यांना होणार वाटप; काय आहेत अटी पहा…

मुंबई : (Farmers in Maharashtra will get solar pumps under PM Kusum Yojana) शेतकरी (Farmers) म्हटलं की, संकट त्याच्या पाचवीला पुजलेलंच आहे. कोणतंही सरकार (Governments) आलं काय अन् गेलं तरीही बळीराजाचे दुःख आहेत तिथेच आहे. मात्र, आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतीसाठी वीजेची समस्या गंभीर होताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत (PM Kusum Scheme) राज्य सरकारकडून (State Governments) शेतकऱ्यांसाठी 5 लाख शेतकऱ्यांना (Five Lakh Farmers) सौर पंपांचं वाटप (Solar Pump) करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती. यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, येथील शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका सर्वाधिक बसतो. पंतप्रधान कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सौरपंपांवर 30 टक्के, राज्य सरकारकडून 30 टक्के आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के खर्च स्वतः भरावा लागणार आहे.

पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरतील. शेततळं, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले यांच्या शेजारील पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतील. अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरीच यासाठी अर्ज करू शकतात. अशा प्रकारची अट घालण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रं (Documents) आवश्यक? सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक
सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक फोटो, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. आधिक माहितीसाठी pmkusum.mnre.gov.in या वेबसाईटला भेट देऊनही शेतकरी पीएम कुसुम योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये