क्राईमताज्या बातम्याशेत -शिवार

धक्कादायक! वर्षभरात मराठवाड्यातील एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

औरंगाबाद : (Farmer Suicide in Marathwada) शेतकऱ्यांच्या नशिबी सदैव संकट आलेलं दिसून येत आहे. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे नापिकी आणि आर्थिक परिस्थितीच्या संकटात सापडलेले अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवत आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा वर्षोनुवर्षे वाढत चालला आहे. 2020 पासून 2022 पर्यंतचा आकडा मन सुन्न करणारा आहे. एकट्या 2022 मध्ये मराठवाड्यात तब्बल 1 हजार 23 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide) केल्याचे समोर आले आहे. ज्यात सर्वाधिक 202 आत्महत्या बीड जिल्ह्यात (Beed District) झाल्या आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा आकडा 730 च्या आत होता, परंतु 2020 मध्ये 773 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर 2021 मध्ये तब्बल 887 जणांनी मृत्यूला कवटाळले होते. आता हा आकडा वाढून 2022 मध्ये 1हजार 23 झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या मागच्या वर्षात झाल्याचं समोर आले आहे.

मराठवाड्यात गेली तीन वर्षे अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अतिवृष्टीमुळे खरीपाचे पीक हातून जात आहे. तर रब्बीच्या पेरणी होताच परतीच्या पावसाचा फटका बसतो. गेली तीन-चार वर्षात मराठवाड्यात जणू हे समीकरण बनलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत हतबल झालेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आयुष्य संपवत आहे. मात्र 2022 मध्ये हा आकडा मोठ्याप्रमाणावर वाढला असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. बीड जिल्ह्यात सर्वातधिक 220 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आहेत. त्यापाठोपाठ औरंगाबाद-180, नांदेड-147, जालना-125, उस्मानाबाद-117, परभणी-77, लातूर-63 आणि हिंगोलीत-44 एकूण -1023 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये