ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

धनुष्यबाण टांगणीला! ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

नवी दिल्ली | Shivsena Symbol – महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद अद्यापही प्रलंबित असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून अखेर निवडणूक आयोगानं पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. 20 जानेवारी) रोजी घेण्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेना (Shivsena) कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) मंगळवारी सुनावणी पार पडली.

ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटानं (Shinde Group) यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपत आहे, त्यामुळे दुहेरी कात्रीत ठाकरे गट सापडला आहे. मंगळवारी शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून वेगवेगळी कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्यात आली आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगात झालेल्या मागील सुनावणीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख पदाला अर्थ नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांनी केला होता. ठाकरे गटाकडून 22 लाख 24 हजार 950 तर शिंदे गटाकडून 4 लाख 51 हजार 127 इतके प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये