“आत्महत्या करण्यासाठी…”, उर्फीनं केलं खळबळजनक ट्विट, सोशल मीडियावर होतेय एकच चर्चा
मुंबई | Urfi Javed – अभिनेत्री, माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अनोख्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तसंच गेल्या काही दिवसांपासून उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. तसंच चित्रा वाघ यांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली आहे. यावरून उर्फी (Urfi Javed) आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद सुरू आहे. अशातच उर्फीनं आत्महत्येवर एक खळबळजनक ट्विट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
उर्फी जावेदनं (Urfi Javed) दररोज एक ट्विट करत चित्रा वाघ यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसंच उर्फीनं पुन्हा एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये तिनं आत्महत्येचा उल्लेख केला आहे. यावरून उर्फी डिप्रेशन मध्ये आहे की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
उर्फीनं एक ट्विट केलं आहे. यामध्ये तिनं म्हटलं आहे की, “आत्महत्या करण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.. त्यामुळे धीर धरा म्हणजे तुम्ही नक्की मराल.” उर्फीनं केलेलं हे ट्विट नेमकं कोणासाठी लिहिलं आहे, हे समजलं नाहीये. पण तिनं केलेल्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. तसंच तिच्या या ट्विटवर नेटकरी कमेंट्स देखील करत आहेत.