ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा पाठिंबा शुभांगी पाटलांनाच, नाना पटोलेंची मोठी घोषणा

नाशिक | Nana Patole – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठी घोषणा केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील (Shubhangi Patil) आणि कोकणात बाळाराम पाटील हे पाच उमेदवार महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) असतील, अशी घोषणा नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे. तसंच, पाचही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

यावेळी नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, “शेतकऱ्यांची गळचेपी झाली आहे. तसंच तरुणांची भ्रमनिरास करण्याचं काम झालं असून, बेरोजगारी वाढली आहे. काँग्रेसनं राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे भाजपविषयी तरुणांना राग आहे, हे समोर येत आहे. जगात सर्वात मोठा पक्ष असल्याचं गवगवा करणाऱ्या भाजपला नाशिकमध्ये उमेदवार मिळाला नाही,” असा टोलाही पटोलेंनी लगावला आहे.

“भाजपचा (BJP) नाशिकमध्ये गोंधळ स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात मागून वार करण्याची पद्धत आणली आहे. भाजप दुसऱ्यांचं घर फोडण्याचं काम करतय. ते कोणत्या आधारावर घर फोडत आहेत. अनिल देशमुख प्रकरणातून केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींचा आरोप करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कुठं ठेवलं आहे,” असा सवालही नाना पटोलेंनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये