मोठी बातमी! कसबा पेठ, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक मतदानाच्या तारखा बदलल्या..

पुणे | Pune Bypoll Election – नुकतीच कसबा पेठ (Kasaba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात (Bypoll Election) मोठी बातमी समोर आली आहे. या पोटनिवडणूक (Bypoll Election) मतदानाच्या तारखांमध्ये आता बदल करण्यात आला आहे. (Pune Bypoll Election)
निवडणूक आयोगानं 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख बदलली आहे. आता या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.
बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. या दोन्ही पोटनिवडणुकी (Bypoll Election) दरम्यान बारावीच्या परीक्षा असल्याचं या अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे या गोष्टीची दखल घेत आयोगानं कसबा पेठ आणि चिंचवड निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.