देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या यादीतील महाराष्ट्राचा क्रमांक घसरला! शिंदेंपेक्षा ठाकरे लोकप्रिय?

मुंबई : (Mahesh Tapashe On Eknath Shinde) नुकताच इंडिया टूडे – सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ आपला एक सर्वे जाहिर केला आहे. या सर्वेक्षणात राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असं समोर आलं आहे. त्याचबरोबर देशभरातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? अशी देखील यादी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. या सर्व्हेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान महेश तपासे म्हणाले, “आज अनेक मुद्दे महाराष्ट्रात असताना ते मुद्दे हाताळण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. दबावतंत्राचे राजकारण करुन सरकार काबीज केले ते जनतेला रुचलेले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होतील तेव्हा ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होईल”, असेही महेश तपासे म्हणाले. ‘सी वोटरचा’ जो सर्व्हे आला त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली याचा अर्थ राज्यातील जनतेचा कौल कोणत्या दिशेने आहे हे शिंदे समर्थकांनी लक्षात घ्यावे असेही ते म्हणाले आहेत.
इंडिया डुटे – सी वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव पुढे आले आहे. त्यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमाकांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांना १६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असून त्यांना सात टक्के लोकांनी पसंती दिली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यंमत्री एम. के. स्टॅलिन, पाचव्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, सहाव्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरम, सातव्या क्रमाकांवर शिवराज सिंह चौहान, आठव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून, त्यांना फक्त दोन टक्के लोकांनी पसंती दिली आहे.