धंगेकरांना मनसेचे बळ? कसबा पोटनिवडणूक; बंडखोरी ठरणार डोकेदुखी…
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे (Kasba By-election) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) बळ लाभणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackerey, MNS) यांनी प्रत्यक्ष तसा आदेश दिला नसला तरी देखील मनसे खऱ्या अर्थाने रुजविणारे आणि मूळ मनसेच्या कार्यकर्त्यांचा संच बांधलेले धंगेकर यांना मित्रत्वाच्या सहाय्याने मदत करायची, असा निश्चय कसब्यातील हिंदुत्ववादी आणि मनसैनिकांनी केला असल्याचे खात्रीलायक वृत्त राष्ट्रसंचारच्या हाती आले आहे.
नाराजांची मनधरणी करण्यास दोन्हीही मतदारसंघात महाविकास आघाडीला अपयश आल्याने हे बंडखोर त्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. कसब्यात बाळासाहेब दाभेकर, तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांची उमेदवारी महाविकास आघाडीला त्रासदायक ठरणार आहे. सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले आहे.
पुण्यातील कसबा (Kasba) मतदारसंघातील आ. मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या जागांसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, आजपासून प्रचार मोहिमेला सुरुवात झाली. भाजप व महाआघाडीत (Mahavikas Aghadi) थेट सामना असला तरी या निवडणुकीत मनसेची भूमिका गुलदस्त्यात होती. मनसे काय भूमिका घेणार, भाजपला पाठिंबा देणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. अखेर मनसेने आपली भूमिका जाहीर केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackerey)यांचे आदेश मिळेपर्यंत मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नये, असे आदेश पदाधिकाऱ्यांना व मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मनसे तटस्थ राहणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे (BJP Pune) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला होत आहे. या जागेसाठी निवडणूक अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४० उमेदवारांनी ५३ अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत. तर पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात एकूण ३३ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे ३३ आणि ४० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला आहे. दरम्यान, नाराजांची मनधरणी करण्यास दोन्हीही मतदारसंघात महाविकास आघाडीला अपयश आल्याने हे बंडखोर त्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. कसब्यात बाळासाहेब दाभेकर, तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांची उमेदवारी महाविकास आघाडीला त्रासदायक ठरणार आहे.
सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना फोन करत आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या मताला डावलून सर्वपक्षीय नेत्यांनी आपापली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता एकंदरीत भाजपच्या बिनविरोध पोटनिवडणुकीचे प्रयत्न पूर्णतः फसले आहेत. आता संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.