ताज्या बातम्या

“उद्धव भाऊंच्या काळात…”; ‘अजान’वरून प्रवीण तोगडिया यांचा राज ठाकरेंना सवाल

बुलढाणा | आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला आहे. “उद्धव भाऊंच्या काळात अजानच्या मुद्द्यावरून राज ठाकरे मैदानात उतरले होते. आता काय झाले? मित्रांचे सरकार आलंय. आता कधी आंदोलन करणार?” असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे. तोगडिया यांच्या या सवालावर राज ठाकरे आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

औरंगजेबावर प्रेम करणारे अनेक

यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही महाराष्ट्रातील राजकारण्यांचे कान टोचले आहेत. महाराष्ट्रात औरंगजेबावर प्रेम करणारे छूट भैया अनेक आहेत, त्यांनी औरंगजेबाच्या जन्मगावी जावं. मुस्लिम लोकसंख्या वाढू नये यासाठी कायदा बनवावा. हिंदूंनी तर लोकसंख्येवर नियंत्रण केले आहे, असं तोगडिया म्हणाले.

पुढे त्यांनी रामदेव बाबांची बाजू घेत आपले मत मांडले. मुसलमान पाच वेळा नमाज अदा करूनही चुकीचं काम करतात, रामदेव बाबांच्या विधानाचं तोगडिया यांनी समर्थन केलं. बाब रामदेव चुकीचं बोलत नाहीत. लव्ह जिहादच्या कायद्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही गरज पडल्यास भेटेल, असे ते म्हणाले.

कलम 370 हटवूनही काश्मीरमधील हिंदू सुरक्षित नाही. यावर केंद्राने कडक पावल उचलली पाहिजेत. काश्मीर खोऱ्यातील सर्व तालिबानी मदरसे, मशीद वर बंदी घालायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते करतील अशी मला आशा आहे, असंही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये