रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती, मुंबईचा वेग वाढणार; नरेंद्र मोदींचे प्रतिपादन
मुंबई : (Narendra Modi Vande Bharat Train) वंदे भारत ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. हे भारताच्या गती आणि प्रमाणाचे प्रतिबिंब आहे. वंदे भारत किती वेगाने सुरू करत आहे ते तुम्ही पाहू शकता. १० ट्रेन सुरू झाल्या आहेत, असे नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. पहिल्यांदा २ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. ह्या ट्रेन मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक, शेतकरी आणि भाविक यांना याचा फायदा होईल असं देखील ते म्हणाले.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तिर्थक्षेत्राला चालना मिळेल. देशात मेट्रोचा विस्तार होत आहे. तसेच नवीन विमानतळ बनवले जात असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत म्हणाले, वंदे भारत ट्रेनला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशातील नववी आणि दहावी ट्रेन सुरू झाली आहे, असं ते म्हणाले.
आर्थिक राजधान्यांना ह्या ट्रेन जोडल्या जाणार आहेत. मोठ्या गतीने देशात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. देशातील १७ राज्यातील १०८ जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनने जोडले आहेत. मुंबईतून दोन वंदे भारत गाड्या एकाच वेळी धावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून एक गाडी साई नगर शिर्डी आणि दुसरी सोलापूरला रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.