Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा अखेर राजीनामा; ‘हे’ आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

मुंबई : Maharashtra Governor Resign : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Resing) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाराष्ट्रात विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आंदोलने देखील केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त होती. त्यांनी याबाबत राष्ट्रपतींकडे अर्ज देखील केला होता. आता राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Dropadi Murmu) यांच्याकडून कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राला झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais Governor Of Maharashtra) हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी बसणार आहेत.

दरम्यान, आज देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत. त्यातच भगतसिंह कोश्यारी यांची देखील बदली झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari Resign) यांच्या बदलीने विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये