‘कांतारा 2’मध्ये उर्वशी असणार हिरोईन? प्रोडक्शन हाऊस कडून स्पष्टीकरण

Urvashi Rautela In Kantara 2 लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या चाहत्यांकडून तिच्या लहान लहान कृतींवर लक्ष ठेवले जाते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नावानेही तिला चाहत्यांनी उचलून धरले होते. दरम्यान, आता एका वेगळ्याच कारणाने उर्वशी चर्चेत आहे.
उर्वशीने नुकताच कांतारा (Kantara) चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेल्या रिषभ शेट्टी (Rishabh Shetty) सोबतचा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत असून ती कांतारा 2 (Kantara 2) मध्ये दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामागचं कारण म्हणजे तिने शेअर केलेल्या पोस्ट मध्ये काही कॅप्शन नसले तरी त्यात ‘कांतारा 2’ असा हॅश टॅग (#Kantara) वापरला आहे. त्यामुळे उर्वशी कांतारा 2 मध्ये (Urvashi Rautela In Kantara) हिरोईन असेल असे चाहत्यांना वाटत आहे.
मात्र, कांताराच्या प्रोडक्शन हाउसकडून खुलासा समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की उर्वशी ‘कंतारा 2’ (Kantara 2) चित्रपटात काम करणार आहे, या बातमीत तथ्य नाही. उर्वशी रौतेला ‘कंतारा 2’ मध्ये कास्ट होणार असल्याच्या सर्व अफवा खोट्या आणि निराधार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.