“…म्हणून क्रिकेटपटू फिट असतानाही इंजेक्शन घेतात” टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्त्याचा धक्कादायक खुलासा
Chetan Sharma Sting Operations : टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांनी एका स्टिंग ऑपरेशमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात त्यांनी टीम इंडियाबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) सध्या चर्चेत आहेत. त्यांनी एका स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि खेळाडूंच्या फिटनेसबाबत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. यानंतर शर्मा यांना त्यांच्या पदावरून हटवले जाऊ शकते अशा बातम्या येत आहेत.
चेतन शर्माने काय खुलासे केले ?
खेळाडू 80 ते 85 टक्के फिट असताना, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन करण्यासाठी इंजेक्शन घेतात, असं स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी म्हटलय. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजच्यावेळी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पुनरागमनावरुन त्याच्यात आणि टीम मॅनेजमेंटमध्ये मतभेद होते. बुमराह अजून टीमच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी सामन्यांची सीरीज आणि त्यानंतर तीन दिवसीय सामन्यांच्या सीरीजमध्ये बुमराह खेळण्याची शक्यता नाहीय. माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव (Sourav Ganguly) गांगुली यांच्यामध्ये अहंकाराची लढाई होती, असं चेतन शर्मा म्हणाले. कोहली कॅप्टनशिपच्या वादात खोटं बोलला होता असही चेतन शर्मा म्हणाले.