ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

त्रास बापटांना झाला पण, यातना आम्हाला होत होत्या, आनंद दवेंची भावनिक प्रतिक्रिया

पुणे : (Anand Dave On Girish Bapat) कर्करोगाने ग्रासलेलं असूनही आणि वरचेवर डायलेसिस करावं लागत असूनही खासदार गिरीश बापट कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करताना दिसले. नाकात नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि सोबत ऑक्सिजन सिलिंडर अशा अवस्थेत गिरीश बापट केसरीवाड्यातील कार्यकर्ता मेळाव्यात पोहोचले. बापटांची अशी अवस्था भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी वेदनादायक होती. गिरीश बापट यांनी केसरीवाड्यातील मेळाव्यात लहानसे भाषणही केले होते. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि गिरीश बापट दोघेही भावूक झाले होते. यावरुनच कसब्यातील हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

कसबा पोटनिवडणूकीतील हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध केला आहे. गिरीश बापटांना अशा अवस्थेत पाहून मनोहर पर्रीकर यांची आठवण झाली. आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही. त्रास बापटसाहेबांना होत होता. पण यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा आम्हाला मानसिक त्रास होत आहे. बापट यांना त्रास होत असतानाही प्रचारात उतरवल्यानं दवे यांनी एक दिवस स्वत:चा प्रचार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप कमी काम केलंय. पण तरीसुद्धा मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही, असं सांगून बापटांनी कसब्याच्या प्रचार मोहिमेतून माघार घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये