आदिलची भेट घेऊन परतल्यावर राखीने घातला हिजाब; नमाज पठण करतानाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
मुंबई | ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी आईचं आजारपण, निधन आणि पतीकडून फसवणूक अशा अनेक गोष्टींना सामोरं जात आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी पती आदिल खान दुर्रानीवर फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर सध्या आदिल खान तुरुंगात आहे. राखीने तुरुंगात आदिलची भेटही घेतली आहे. आता राखीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिने नमाज पठाण करताना रेकॉर्ड केला आहे.
राखी सावंतने इन्स्टाग्रामला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती हिजाब घालून दिसत आहे. “नशिबाला जसं हवं होतं, तसे मी बदलले. खूप जपून पावलं टाकली, निर्णय घेतले, तरी चुकलेच मी. कोणी विश्वास तोडला तर कोणी हृदय. पण लोकांना वाटतं खूप बदलले आहे मी” अशा आशयाच्या ओळींवर राखीने हा व्हिडीओ तयार करून शेअर केला आहे.