कांगारूंच्या मनात भरलं पराभवाचं वारं! तब्बल अर्धा डझन खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट

IND vs AUS 3rd Test Australian Player Returning Home : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी मालिकेतील आता कुठे दोन कसोटी सामने झाले आहेत. मात्र कांगारूंचा संघ भारतीय फिरकीची जादू पाहून मनात वारं भरलं तर नाही ना? असा सवाल भारतीय क्रिकेटप्रेमींकडून केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे, एका पाठोपाठ एक खेळाडू मायदेशाची वाट धरू लागले आहेत. भारताने पहिल्या दोन कसोटी अवघ्या 6 दिवसात जिंकल्या.
मालिकेतील तिसरी कसोटी ही इंदौर येथे होणार आहे. या कसोटीला अजून 8 दिवस अवकाश आहे. मात्र तोपर्यंतच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ मायदेशात परतला आहे. नुकतेच मॅट रेनशोने देखील मायदेशात मायदेशात परतला. त्याच्या सोबतीला लान्स मॉरिस देखील आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे पॅट कमिन्स, जॉश हेजलवूड, अॅश्टन एगर आणि डेव्हिड वॉर्नर मयादेशात परतले होते. आता या दोघांची देखील भर पडली आहे.
पॅट कमिन्स (कुटुंबाचे वैद्यकीय कारण), डेव्हिड वॉर्नर (कोपराची दुखापत), अॅश्टर एगर (शेफिल्ड शिल्ड खेळण्यासाठी), जॉस हेडलवूड (घोट्याची दुखापत), टॉड मर्फी (साईड स्ट्रेन), मिचेल स्वेपसन (सध्या ऑस्ट्रेलियातच आहे), लान्स मॉरिस (शेफिल्ड शिल्ड खेळण्यासाठी), मॅथ्यू रेनशॉ पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणाने तातडीने मायदेशात परला. तर डेव्हिड वॉर्नर, हेजवलूड, टॉड मर्फी यांना दुखापतीमुळे मायदेशात परतावे लागले. अॅश्टन एगरला संघ व्यवस्थापन खेळवणार नसल्याने तो मायदेशात परतला आहे. तो ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत स्पर्धा शेफिल्डी शिल्ड खेळणार आहे.
दुसरीकडे या मालिकेतील पहिल्या कसोटीत दमदार कामगिरी करणाऱ्या टॉड मर्फीला साईड स्ट्रेनचा त्रास होऊ लागल्याने तो मायदेशात परतला आहे. तर मिचेल स्वेपसन हा त्याच्या मुलाच्या जन्मासाठी दौरा सोडून ऑस्ट्रेलियाला परतला आहे. वेगवान गोलंदाज लान्स मॉरिस देखील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा खेळण्यासाठी मायदेशात परतला आहे. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन फिट झाल्याने ते मॉरिस मायदेशी परतला.