ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळीसिटी अपडेट्स

रूपाली ठोंबरेंचं नाव ऐकलं अन् शरद पवार म्हणाले, “भांडखोर आहे फार, पोलीस काही बोलले तर ती थेट…”

पुणे | Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) या एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. तसंच शरद पवार (Sharad Pawar) यांना रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारला असता ती भांडखोर असल्याचं ते म्हणाले. तसंच पोलिसांनी प्रश्न विचारला की ती थेट त्यांच्या अंगावर जाते. त्यामुळे तिला आवरावं लागतं असंही शरद पवार म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. सोबत शरद पवारही दिलखुलासपणे हसू लागले.

शरद पवार यांना पत्रकारांनी रूपाली ठोंबरे पाटील यांच्याविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना तुम्ही कुणाविषयी बोलताय? असं शरद पवार म्हणाले. मग रुपाली ताई ठोंबरे पाटील असं एका पत्रकारानं सांगितल्यावर शरद पवार पटकन म्हणाले भांडखोर आहे फार. पोलीस काही बोलले तर ती थेट त्यांच्या अंगावर जाते. त्यामुळे तिला आवरावं लागतं, असं ते म्हणताच पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, रूपाली पाटील यांनी डिसेंबर 2021 मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसंच महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली आहेत. त्या पुणे मनपात मनसेच्या नगरसेविका होत्या. तर 2017 मध्ये त्यांनी पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये