ताज्या बातम्यादेश - विदेश

“मी आठ वर्षांची असताना वडिलांनी माझ्यासोबत…”, खुशबू सुंदर यांचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | Khushbu Sundar – नुकतीच खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. खुशबू सुंदर यांनी अभिनय क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला आहे. तसंच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. तसंच आता त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत. मी 8 वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझं लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप खुशबू सुंदर यांनी केला आहे.

खुशबू सुंदर यांनी मोजो स्टोरीसाठी बरखा दत्त यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, “मला वाटतं की जेव्हा एखाद्या मुलावर अत्याचार होतो, तेव्हा त्या मुलाच्या मनात आयुष्यभरासाठी भीती बसते. मग तो मुलगा असो की मुलगी. माझ्या आईलाही खूप त्रास सहन करावा लागला होता. बायकोला आणि मुलांना मारहाण करणे, स्वत:च्या एकुलत्या एक मुलीवर लैंगिक अत्याचार करणं हा त्यांचा (वडिलांचा) जन्मसिद्ध हक्क आहे, असं त्यांना वाटलं असावं. जेव्हा माझ्यावर अत्याचार झाला तेव्हा मी फक्त 8 वर्षांची होते. तसंच मी 15 वर्षांची असताना मला त्याविरुद्ध बोलण्याचं धाडस आलं.”

वी द वुमन इव्हेंटमध्ये त्या म्हणाल्या, “मला सतत भीती वाटायची की, माझी आई माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण काहीही झालं तरी, माझा पती माझा देव आहे, अशी तिची मानसिकता असल्याचं मी पाहिलंय. पण मला वयाच्या 15 व्या वर्षी वाटलं की पुरे झालं आणि मी त्यांच्या विरुद्ध बंड करू लागले. माझा वय 16 वर्षही नव्हतं तेव्हा त्यांनी आम्हाला सोडलं. तेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं. त्यावेळी जेवणासाठी पैसे कसे आणि कुठून येतील हेही आम्हाला माहीत नव्हतं. पण शेवटी आम्ही सर्व अडचणींना धैर्यानं तोंड दिलं”, असंही खुशबू सुंदर यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये