क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभादेवी गोळीबार प्रकरण! पोलिसांकडून अहवाल सादर, बंदूक सदा सरवणकर यांचीच, पण…

मुंबई : (Sada Sarvankar Gun Fire Matter) प्रभादेवी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी गोळीबार केली नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. बंदूक ही सदा सरवणकर यांचीच आहे, पण गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचं पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. हा गोळीबार शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता.

ही बंदूक माझीच होती, पण ती गाडीत होती. कुणीतरी ती घेऊन येत असताना त्यावेळी चुकून गोळी झाडली गेल्याचं सदा सरवणकर यांनी म्हटलंय. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी मात्र हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला आहे. अशा घटनांमुळे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था ठासळत आहे. पोलिसानी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता आता हा अहवाल दिला आहे, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताही कमी होत आहे.

गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं.

पोलिसांनी घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये