भावाचा नादच खुळा! शिवसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की, व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | Shiv Thakare – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) मुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) प्रसिद्धीझोतात आला आहे. सोशल मीडियावर नेहमीच तो चर्चेत असतो. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच बिग बाॅस जरी संपलं असलं तरी चाहत्यांमध्ये शिवची क्रेझ कायम आहे. असाच एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये शिवसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे.
शिव ठाकरेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत शिवसोबत सेल्फी घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसंच त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसतंय.
शिव एका इव्हेंटला गेला होता. त्यावेळी अचानक शिवचे चाहते त्याच्या समोर येतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसंच बाऊन्सरचं सुरक्षा कवच तोडून ते शिवसोबत एक सेल्फी घेण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करतात. मात्र, बाऊन्सर्स ही परिस्थिती नियंत्रणात आणतात. विशेष म्हणजे शिव या गर्दीतही चाहत्यांना गोड स्माईल देताना दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.