मालतीने सेलिब्रेट केला पहिला इस्टर, प्रियांकाने शेअर केले खास फोटो

मुंबई | Priyanka Chopra – सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत आहे. सध्या ती भारतात आली असून काही दिवसांपूर्वीच तिनं आपली लेक मालती मेरी चोप्रासह (Malti Marie Chopra) सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळीचे त्या दोघींचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तसंच प्रियांका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिच्या लेकीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच आता तिच्या लेकीनं मालतीनं यावर्षीचा पहिला इस्टर (Easter) सेलिब्रेट केला आहे. याचे काही खास फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालतीचे पहिल्या इस्टर सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. मालती या फोटोंमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. तसंच मालतीनं एक व्हाईट कलरचा टी-शर्ट घातला आहे. ‘मालती मेरी फर्स्ट इस्टर’ असं त्या टी-शर्टवर लिहिलेलं आहे.
तसंच प्रियांकाने मालतीसोबतचा एक मिरर सेल्फीही शेअर केला आहे. या सेल्फीत प्रियांका आणि मालतीनं सेम ड्रेस घातल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत मालती बागेत कुत्र्यांसोबत खेळताना दिसत आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
दरम्यान, प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियांका भारतात आली असल्याचं म्हटलं जातंय.