इतरक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

रिंकू सिंगची तुफान खेळी, अनन्या पांडेच्या मनात घर करून गेली; पोस्ट शेअर करत म्हणाली…

मुंबई | Ananya Pandey – काल (9 एप्रिल) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगतदार सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताने 3 विकेट्स राखत दणदणीत विजय मिळवला. गुजरातनं कोलकाताला 205 धावांचं लक्ष्य दिलं होतं. तर कोलकातानं 207 धावा करत मोठा विजय मिळवला. या सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते कोलकाताच्या रिंकू सिंगनं (Rinku Singh). रिंकू सिंगनं शेवटच्या ओव्हरमध्ये पाच षटकार मारत हा सामना आपल्या नावे केला. सध्या रिंकूच्या या आक्रमक खेळीचं सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. यामध्ये बाॅलिवूडची अभिनेत्री अनन्या पांडेंनंही (Ananya Pandey) रिंकू सिंगचं कौतुक केलं आहे.

अनन्या पांडेंनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिनं रिंकू सिंगचं कौतुक केलं आहे. ही स्टोरी शेअर करत तिनं रिंकूचा किंग म्हणून उल्लेख केला आहे. सध्या तिची ही स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

image 1

दरम्यान, रिंकू सिंगने त्याच्या अफलातून खेळीने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रिंकूनं लगातार पाच षटकार ठोकून कोलकाताला दणदणीत विजय मिळवून दिला. रिंकूनं अशाप्रकारची फलंदाजी करत इतिहास रचला आहे. तसंच सध्या त्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये