ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“भगवे कपडे घालून कुणी हिंदू होत नाही, रावणानेही भगवे कपडे घालून…”, नाना पटोलेंचा शिंदे सरकारला खोचक टोला

मुंबई | Nana Patole – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. भगवे कपडे घालून कोणी हिंदू होत नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. रविवारी (9 एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अयोध्येचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. यामध्ये नाना पटोलेंनी देखील एकनाथ शिंदे आणि भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, “यांना हिंदूंचे ठेकेदार म्हणून कुणी प्रमाणपत्र दिलेलं नाही. भगवे कपडे घालून कुणी हिंदू होत नाही. स्वत:ला हिंदुत्वाचे ठेकेदार म्हणणं हे एकप्रकारे सोंग घेणं आहे. रावणानंही भगवे कपडे घालून सीतेचं अपहरण केलं होतं. त्यामुळे भगवे कपडे घालून सगळे साधू संत होतात असं नाही.”

दरम्यान, नाना पटोले यांनी ही टीका केलेली असतानाच आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भगवी बिकीनी चालत नाही पण भगवा कार्पेट चालतो. बिन्धास्त पादत्राणे घालून भगवा कार्पेट तुडवा. जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळून सत्तेचा सारीपाट भाजप कसा मांडते याचं हे उदाहरण. दांभिकपणा हा भाजपचा स्थायीभाव आहे. धार्मिक द्वेष पसरविण्यातून यांचे राजकारण होते पण देश कमजोर होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये