‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ, ॲडव्हान्स बुकिंगला तुफान गर्दी

मुंबई | Kisi Ka Bahi Kisi Ki Jaan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. तसंच ही ॲडव्हान्स बुकिंग करण्यासाठी प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सलमानचा हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यात काही शंकाच नाही.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे लंडनमध्ये या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया आणि यूरोपियन देशांमध्ये चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाचं तिकीट विकले गेले आहेत. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे.