गँगस्टर अतीक अहमदच्या मुलाचं एन्काऊंटर, उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची कारवाई

झाशी | Atiq Ahmad Son Encounter – उत्तर प्रदेशमधील गँगस्टर अतीक अहमदचा (Atiq Ahmad) मुलगा असदचं एन्काऊंटर (Asad Encounter) झालं आहे. उमेश पाल खून प्रकरणात (Umesh Pal Murder Case) असद मुख्य आरोपी होता. या प्रकरणात असदसोबत गुलाम नावाच शूटर त्याचा सह-आरोपी होता. त्याचाही एन्काऊंटर करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सनं झाशीमध्ये केली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी या एन्काऊंटरसंबंधी माहिती देताना सांगितलं की, अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघं उमेश पाल हत्याकांडात वाॅन्टेड होते. तसंच झाशीचे डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखाली यूपीच्या स्पेशल टास्क फोर्ससोबत (UP STF) झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा करण्यात आला. या दोन्ही आरोपींना एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी हत्यारं टाकून आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. मात्र, दोन्ही आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात असद आणि गुलामचा मृत्यू झाला आहे.