ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा जिंकू”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई | Sanjay Raut – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू, असं संजय राऊत म्हणाले. ते आज (14 एप्रिल) सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. आम्ही राज्यात लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू असं वातावरण आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. तसंच राहुल गांधींची भेट झाली त्यावेळी मी त्यांना महाराष्ट्रात यावं असं सांगितलं होतं. त्यामुळे राहुल गांधी महाराष्ट्रात येतील. सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि सत्ताधाऱ्यांचा जो भ्रम आहे तो तुटून पडेल, असंही राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, अलिकडेच मी दिल्लीत राहुल गांधींना भेटलो. सोनिया गांधीही तिथे होत्या तेव्हा आमची राजकीय वातावरणाविषयी चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही महाराष्ट्रात यायला हवं. आपण सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. तसंच सोमवारी (17 एप्रिल) काँग्रेसचे महासचिव वेणूगोपाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. त्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे”, असंही संजय राऊतांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये