इतरक्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

विराट कोहली मोठ्या पडद्यावर झळकणार? बाॅलिवूड अभिनेत्यानं दिली ‘या’ चित्रपटात अभिनय करण्याची ऑफर

मुंबई | KRK Tweet On Virat Kohli – बाॅलिवूड अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरके (KRK) नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. तो बऱ्याचदा वादातही सापडला आहे. केआरके नेहमी खळबळजनक ट्विट करत असतो. आताही त्यानं एक ट्विट केलं असून सध्या त्याचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

केआरकेनं नुकतंच एक ट्विट केलं असून यामध्ये त्याने विराट कोहलीचा (Virat Kohli) उल्लेख केला आहे. केआरकेनं चक्क विराट कोहलीला एका चित्रपटाची ऑफर दिली आहे. त्यानं ट्विट करत म्हटलं आहे की, “मी विराट कोहलीच्या डान्स स्किल्सने प्रभावीत झालो आहे. त्यामुळे मी त्याला माझ्या ‘देश द्रोही 2’ या चित्रपटात आयटम नंबर करण्याची ऑफर देत आहे.”

https://twitter.com/kamaalrkhan/status/1646886832372690944

केआरकेचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यानं विराटचा एक मजेशीर व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये विराट मैदानात डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच केआरकेनं केलेल्या ट्विटवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. तसंच या ट्विटमुळे केआरके पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये