नवरा असावा तर असा! रणबीरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलियाला दिलं सगळ्यात महागडं गिफ्ट, किंमत ऐकून व्हाल चकीत

मुंबई | Ranbir Kapoor – रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. नुकताच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. त्यावेळीचे त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच आता रणबीरनं आलियाला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सगळ्यात महागडं गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची किंमत ऐकून तुम्हीही चकीत व्हाल. सध्या या गिफ्टचीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
रणबीरला त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी पापाराझींनी मुंबई एअरपोर्टवर स्पाॅट केलं होतं. यावेळी त्याच्या हातात एक गुलाबी रंगाची स्लिंग बॅग दिसत आहे. रणबीरनं ही बॅग आलियासाठी लंडनहून खरेदी केली होती. त्यानंतर त्याचदिवशी रणबीर आणि आलिया त्यांच्या नवीन घराचं बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ती बॅग आलियाच्या हातात दिसली.
रणबीरनं आलियाला दिलेली ही बॅग जरी छोटी असली तरी तिची किंमत फार मोठी आहे. या छोट्याश्या बॅगची किंमत तब्बल 10 लाख रूपये असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या गिफ्टची किंमत ऐकून चाहते चकीत झाले आहेत.