क्राईमताज्या बातम्यापुणे

आई गावाला गेल्यानंतर संधी साधून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

पुणे | आजही सार्वजनिक किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना अत्याचार, विनयभंग यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. पुणे शहरात महिलांवरील अत्याचार दिवसांगणिक वाढत आहेत. अशातच पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या एका तरुणास विमानतळ पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी संदीप चंदू पासी (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गावी गेली होती. आरोपी पासी महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहे. आरोपी पासीने महिलेच्या दोन अल्पवयीन मुलींना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने त्यांच्यावर अत्याचार केले. आई गावाहून परत आल्यानंतर घाबरलेल्या मुलींनी तिला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी संदीप पासी याला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये