ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

धनंजय मुंडेंना माध्यमांचा प्रश्न, राष्ट्रवादीत All is well? धनू भाऊचा पहाडी भाषेत उत्तर म्हणाले…

मुंबई : (Dhananjay Munde On Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या कथित चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. त्यानंतर अजितदादांचे खांदे समर्थक आमदार धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादीत All is well आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर मुंडेंनी खास प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना धनंजय मुंडे आपल्या पहाडी भाषेत म्हणाले, राष्ट्रवादीत Perfectly well अशी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या सचिवांना भेटल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलं.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. त्यावर अजित पवार हे वारंवार खुलासा देखील करत आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे हे नॉल रिचेबल असल्याच्या माध्यमात चर्चा सुरु होत्या. या सर्व चर्चा मुंडे यांनी फेटाळल्या आहेत.

राज्यात नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. त्यात काही तथ्य नाही, अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये