ताज्या बातम्यामनोरंजन

ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर शाहिद कपूर संतापला; म्हणाला, “एलाॅन तू थांब…”

मुंबई | Shahid Kapoor – काल (21 एप्रिल) ट्विटरवर (Twitter) एक मोठा बदल करण्यात आला आहे. ट्विटरवरून अनेक दिग्गज, नेतेमंडळी, खेळाडू, सेलिब्रिटी यांच्या अकाऊंटवरून ब्लू टिक (Blue Tick) काढण्यात आलं आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच एलाॅन मस्क (Elon Musk) यांनी ब्लू टिकसाठी पैसे मोजावं लागणार असल्याचं सांगितलं होतं. याच निर्णयाची आता अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसंच ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर त्यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेता शाहिद कपूरनेही (Shahid Kapoor) मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विटरने ब्लू टिक हटवल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला आहे. यामध्ये एका नेटकऱ्यानं शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटातील एक सीन दाखवला आहे. या सीनमध्ये शाहिद कपूर बुलेट घेऊन रागात जाताना दिसत आहे. तसंच त्या मीममध्ये लिहिलं आहे की, शाहिद कपूर ब्लू टिक हटवल्यानंतर एलाॅन मस्ककडे जात आहे. “माझं ब्लू टिक आहे ते”,असं तो म्हणत आहे.

या मीमवर शाहिदनं मजेशीर कमेंट केली आहे. “माझ्या ब्लू टिकला हात कुणी लावला…एलाॅन, तु थांब मी येत आहे”, असं शाहीदनं ट्विट करत म्हटलं आहे. सध्या शाहिदचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

https://twitter.com/shahidkapoor/status/1649361759374028800

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये