शाहरुख खान लेक अबरामसोबत दिसला मन्नत बाहेर, चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!
मुंबई | शाहरुख खान नेहमी ईदच्या निमित्ताने त्याच्या मुंबईतील घराबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणे शाहरुखने यंदाही आपल्या चाहत्यांना मन्नतबाहेर येत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्याच्या सोबत त्याचा मुलगा अबरामदेखील पाहायला मिळाला. त्यामुळे खान पितापुत्रांनी आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. पांढऱ्या रंगाचा पोशाख घातलेला शाहरुख खान मन्नतच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांकडे हात हालवत त्यांना शुभेच्छा देताना आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना दिसत होता. अभिनेत्याने हसून कॅमेऱ्यांसमोर पोज दिली. या वेळी जनसमुदयाला अभिवादन करताना सुपरस्टारसोबत त्याचा मुलगा अबराम देखील उपस्थित होता.
ईदनिमित्त शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. ईदनिमित्त शाहरुख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर आज सकाळपासूनच चाहत्यांची मोठी गर्दी ही बघायला मिळत होती. शेवटी शाहरुख खान याने चाहत्यांना निराश न करता बंगल्याबाहेर येत शाहरुख खान हा चाहत्यांना भेटला आहे. शाहरुख खानने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे.
शाहरुख खान याला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावताना दिसत नाहीये. शाहरुख खान याला पाहून चाहते उत्साही झाले. आता शाहरुख खान याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यावेळी शाहरुख खान हा पांढऱ्या रंगाच्या टिशर्टमध्ये दिसत आहे. एकप्रकारे शाहरुख खान याने चाहत्यांना गिफ्टचे दिले आहे. काही दिवसांमध्ये शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. डंकीनंतर लगेचच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. जवान चित्रपटांच्या सेटवरील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते.