ताज्या बातम्यामनोरंजन

बाबो! अमोल कोल्हेंचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, स्वत:च केला खुलासा; म्हणाले, “ती मुळची पुण्याची असून सध्या…”

मुंबई | Amol Kolhe – राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत येत असतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते राजकारण, अभिनय क्षेत्राशी संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. आताही अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत खुलासा केला आहे. तसंच त्यांच्या या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमोल कोल्हेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं, अशा कविता म्हणायला फार मज्जा वाटते. पण प्रेम व्यक्त करायला ताकद लागते. तेवढीच ताकद प्रेमाची कबुली देण्यासाठीही लागेत. त्यात जर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल तर मग आणखी ताकद लागते.”

“एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे तीन प्रकर असतात. A – लग्नाआधी जुळलेलं, B – लग्नानंतर जुळलेलं आणि C – लग्नाआधी जुळून लग्नानंतरही सुरू असलेलं. आज हे सगळं सांगण्याची गरज आहे कारण मी माझ्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची तुमच्या समोर कबुली देणार आहे. कोण आहे ती? कशी आहे ती? याबद्दल मी सांगणार आहे”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हेंनी त्यांचं अमोल ते अनमोल या नावानं एक युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्यांनी या चॅनेलवरून त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची संपूर्ण माहिती दिली आहे. अमोल कोल्हेंचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे कोणत्या मुलीसोबत नसून एका बुलेटसोबत आहे. व्हिडीओमध्ये कोल्हेंनी सांगितलं की, माझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे माझ्या बुलेटसोबत आहे. माझी बुलेट ही मुळची पुण्याची आहे. पण, आता ती मुंबईत असते. मी माझ्या बुलेटसोबत अनेकदा वेळ घालवतो”, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी चांगलीच पसंतीस दर्शवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये