मोबाईल अन् चार्जरनंतर आता थेट बंदूक! सोशल मीडियावर उर्फिचीच चर्चा

मुंबई | हटके स्टाईलच्या बाबतीत उर्फी जावेदच्या (Uorfi Javed) चर्चा आता बॉलिवूडपासून थेट हॉलिवूडपर्यंत रंगू लागल्या आहेत. उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळेच चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. उर्फी जावेद हिची बऱ्याच वेळा इतकी जास्त अतरंगी स्टाईल असते की, सर्वांना धक्का बसतो. उर्फी जावेद सोशल मीडियावर आपल्या बोल्ड लूकने सर्वांनाच घायाळ करत असते. नुकतेच उर्फीचे काही नवे फोटो समोर आले आहेत. यात तिचा आऊटफिट पाहून सगळेच चक्रावले आहेत.
सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिच्या नव्या लूकचे काही फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तिने स्टाइलिश शॉर्ट ड्रेस घातला आहे. उर्फी जावेद हिचे स्कीन रंगाचे टॉप असून त्यावर दोन बंदूका दिसत आहेत. असे सांगितले जात आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत असलेल्या डिंपल कपाडियाच्या सास, बहू आैर फ्लेमिंगो या सीरिजमुळे उर्फी जावेद खूप प्रभावित झाली आणि तिने हा अशाप्रकारचा ड्रेस घातला आहे.