ताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बाॅस 16’ फेम प्रियांका चहर चौधरीनं केली चोरी? ‘त्या’ पोस्टमुळे आली अडचणीत

मुंबई | Priyanka Chahar Choudhary – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) फेम प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) अडचणीत सापडली आहे. प्रियांका चहरवर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. एका फॅशन डिझायरने प्रियांकावर कपडे चोरल्याचा आणि तिची स्टाईल काॅपी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ती डिझायनर तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध डिझायनर इशिताने प्रियांकावर तिचे ब्रँडेड कपडे चोरल्याचा आरोप केला आहे. तसंच तिची स्टाईल काॅपीही केल्याचा आरोप तिनं केला आहे. ‘एबीपी लाइव्ह’च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले फोटो शेअर केले होते. तिनं शेअर केलेल्या या पोस्टनंतर इशितानं दावा केला होता की, प्रियांकानं परिधान केलेले कपडे तिच्या ब्रँडचे कपडे असून ते तिने खास डिझाइन केले होते. त्यामुळे इशितानं ट्विट करत प्रियांकावर गंभीर आरोप केले होते. पण त्यानंतर तिनं तिचं ट्विट डिलीट केलं होतं.

इशिताने एका ट्विटमध्ये प्रियंकावर गंभीर आरोप केले होते. तिनं ट्विट करत म्हटलं की, “एक सायकॉटिक पीआर टीम असलेली वेडी महिला जी इतरांना त्रास देणं थांबवू शकत नाही. ती विषाची व्याख्या आहे. तिनं इतरांना प्रभावित करण्यासाठी खोटं व्यक्तिमत्त्व तयार केलं आहे.”

“तिला वाटतं की माझ्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या क्लोनसारखे कपडे घालून ती माझ्यासारखी बनू शकते. होय हे होऊ शकते कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. तिने माझे 30 हजार पौंड किमतीचे कपडे चोरले. तरी मी काहीच बोलले नाही”, असंही इशितानं म्हटलं आहे.

दुसर्‍या ट्विटमध्ये तिनं लिहिलं आहे की, “सध्या मी देशाबाहेर आहे, पण लवकरच परत आल्यावर प्रियांकावर नक्कीच गुन्हा दाखल करणार आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये