पंजाब विजयी मोहिम कायम ठेवणार की लखनौ स्वप्न धुळीस मिळवणार? मोहालीमध्ये रंगणार सामना

चंदिगढ : (IPL 2023 PBKS Vs LSG) आयपीएलमध्ये सध्या चांगलीच रंगत आली आहे. (IPL 2023) आज 37 वा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन संघांमध्ये रंगणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामातील आजचा सामना 28 एप्रिलला पंजाबच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे.
लखनौ संघाला गामील सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे संघ आज पुन्हा विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे पंजाब किंग्सने मागील सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे, त्यामुळे संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. लखनौ सुपर जायंट्स संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आणि पंजाब संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकून गुणतालिकेत उडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची परिस्थिती समान आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी सात सामने खेळले आहेत. लखनौने यंदाच्या हंगामात खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच पंजाब संघाने खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि पंजाब (PBKS) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 2 सामने खेळवण्यात आले आहेत. दोन्ही संघांची परिस्थिती सारखी आहे.
हा सामना पंजाबमधील क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.