…तर उद्धव ठाकरेंचे कपडे फाडणार; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
मुंबई | भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊतांवर एवढं बोलल्यावर त्यांनी उत्तर द्यायला हवं होतं. संजय राऊत यांनी हडतूड करून का होईना पण माझ्यावर बोलायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असं नितेश राणे म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘ तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांचीच इच्छा दिसते, असा उपरोधिक टोलाही नितेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे.
नितेश राणे यांनी टीका करताना संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘ तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी अलिबागमध्ये दमदाटी करून जागा घेतली. नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा लॅन्डमाफिया असा उल्लेख केला आहे. विक्रोळी आणि भांडूप भागात आर नावाचा जो बिल्डर आहे. त्यासोबत संजय राऊत यांची पार्टनरशिप आहे. त्याअंतर्गत जमिनी किती बळकावल्या. त्याचं उत्तर संजय राऊत या लॅन्डमाफियाने त्याला द्यावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.