“I’m Unstoppable Today…”, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयावर राहुल गांधींचं खास ट्विट

Karnataka Election Results 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. तर आत्तापर्यंतचे कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसनं (Congress) बाजी मारली असून भाजपचा (BJP) मोठा पराभव झाला आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेसनं चांगलीच बाजी मारली आहे. यादरम्यान, काँग्रेसच्या विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खास ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी “मी अजिंक्य आहे, मला विश्वास आहे आणि आज मी थांबणार नाही”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओत राहुल गांधींसोबत अनेक नेतेही दिसत आहेत.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे असून निकाल समोर येत आहे. या निवडणुकीत यंदा काँग्रेसनं बाजी मारली आहे. आत्तापर्यंतच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसनं 124 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप पराभवाच्या दिशेनं जाताना दिसत आहे.