ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

कर्नाटकात काँग्रेसपुढे नवा पेच? सत्ता मिळाली, पण मुख्यमंत्री कोण? ‘ही’ दोन नावे प्रमुख दावेदार

बंगळूरू : (Karnataka Assembly Election Result 2023) कर्नाटकात काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला, असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धारमय्या यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण याचा फैसला उद्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नाव चर्चेत आहे. पण त्याच सोबत आता काँग्रेसचे जेष्ठ नेते परमेश्वर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नावही पुढे येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी या ठिकाणाहून सतिश जारकीहोळी हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे तेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे येऊ शकतात असं म्हटलं जातंय.

कोण आहेत सिद्धरामय्या?
कर्नाटकात काँग्रेसचे दिग्गज नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सिद्धरामय्या यांनी 2013 ते 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात “सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून अनेक बदल घडवून आणले. त्यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरु केल्या. सात किलो तांदूळ देणारी अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना 150 ग्रॅम दूध देणारी क्षीर-भाग्य योजना आणि इंदिरा कॅन्टीनमुळे राज्यातील गरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील उपासमार, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू यांच्याशी लढण्यासाठी योजना आणल्या, ज्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. सिद्धरामय्या यांनी त्यांच्या कार्यकाळात मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप, महिलांसाठी पंचायत अनिवार्य करणे आणि गर्भधारणेनंतर 16 महिन्यांपर्यंत महिलांना पौष्टिक आहार उपलब्ध करुन देऊन महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आणल्या. मात्र सिद्धरामय्या यांनी त्यांच्या सरकारच्या काळात काही निर्णय घेतले होते ज्यामुळे ते लिंगायत, विशेषतः हिंदू मतदारांमध्ये त्याची लोकप्रियता घटली होती

कोण आहेत डीके शिवकुमार?
डीके शिवकुमार यांनी काल म्हणजेच 12 मे रोजी एक ट्वीट केलं होतं ज्यामधून त्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी सांगितल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी डीके शिवकुमार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या तीन वर्षांच्या मेहनतीचा ट्रेलरचा व्हिडीओ शेअर करुन मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.

डीके शिवकुमार हे कनकापुरा मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवकुमार अनेक वर्षांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. 2018 च्या निवडणुकीतही त्यांना मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये