ताज्या बातम्या

शिवाजी विद्यापीठ परिसरात आग; विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने आग विझविण्यात यश

कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Kolhapur) परिसरात भाषा भवनच्या पाठीमागे अज्ञात कारणांमुळे रविवारी भीषण आग (A terrible fire) लागली. उन्हाच्या तडाख्यामुळे सर्वत्र वाळलेले गवत पसरले असल्याने आग वाढीचा वेग भीषण होता. आग विझविण्यासाठी दोन अग्निशामक दल, महानगरपालिका टँकर, विद्यापीठ प्रशासनाचे टँकर आदी यंत्रणा कामाला लागली होती. अशातच आग लवकरात लवकर आटोक्यात येण्यासाठी विद्यार्थ्यांनीही शर्थीचे प्रयत्न केले. 

रविवारी सकाळच्या सुमारास विद्यापीठ परिसरात अचानक आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती की, दोन अग्निशामक दल, महानगपलिका टँकर, विद्यापीठ प्रशासनाचे टँकर आदी यंत्रणा असूनही आग आटोक्यात येत नव्हती. परंतु त्यावेळेस प्राणीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठामधील विद्यार्थी यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग वाऱ्याच्या झोताने बाजूला असलेल्या जंगल झाडीकडे पसरत होती, तेव्हा विद्यार्थ्यांनी चारही बाजूने वाळलेले गवत काढून त्याठिकाणी पाणी, माती टाकून वाढत्या आगीला रोख दिला. ही आग विझेपर्यंत जवळपास दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थी तिथेच थांबून होते.

दरम्यान, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (Dr. D.T. Shirke), प्र. कुलगुरू डॉ. पी. एस पाटील (Dr. P. S Patil) यांच्यासह आदी शिक्षकांनी प्राणीशास्त्र विभागमधील नरसिंग भालके, महेश बंडगर, क्रांती पाणदारे, दीपक देवडकर, उदय कांबळे या विद्यार्थ्यांच्या कार्याची व प्रयत्नांची दखल घेत प्राणीशास्त्र विभागाची प्रशंसा केली आणि विद्यार्थांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये