ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

डंके की चोट पे! एसटी बॅंक निवडणूकीत सदावर्तेंच्या पॅनलचा अभुतपुर्व विजय, पवारांच्या पॅनलला धक्का..

मुंबई : (Gunratna Sadavarte On Sharad Pawar) स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या (State Transport Co Operative Bank) निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 19 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं दिसतंय. शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने दारुण पराभव केलाय.

गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर आपली सत्ता आणण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. सोबतच ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चर्चेत राहिले ते आपल्या विधानांमुळे, कधी मराठा आंदोलनावर भाष्य तर कधी नथुराम गोडसेयांचे समर्थन करताना ते बघायला मिळाले. एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे सदावर्ते पहिल्यांदाच कुठल्यातरी निवडणुकीला सामोरे जात होते. या निवडणूकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत 19 जागांवर विजय मिळाला.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे 150 हून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र, खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली.

जवळपास काही वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर वर्चस्व होतं. ज्यात कामगार संघटना बॅंकेच्या संचालकपदावर असताना भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. गुणरत्न सदावर्तेंसोबतच गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रचारादरम्यान शरद पवारांवर निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये